काँग्रेसचा जाहीरनामा हा ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ : मुख्यमंत्र्यांचा टोला

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘हम निभाएंगे’ असं म्हणत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करून जाहिरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये रोजगाराच्य संधी, शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प तर गरीब जनतेच्या खात्यात थेट पैसे अशी आश्वासन दिली आहेत. त्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा आजचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असून ते कधीच पूर्ण होणार नाहीत, अशी टीका केली.

तसेच हा जाहीरनामा कालच प्रसिद्ध व्हायला हवा होता म्हणजे हे ‘एप्रिल फूल’ आहे हे समजले असते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ते जालन्यात बोलत होते.

कॉंग्रेसने ‘जन आवाज’ असे या जाहीरनाम्याला नाव दिलं आहे. या जाहिरनाम्यात बेरोजगारीपासून ते गरीबी हटावपर्यंत अनेक आश्वासने दिली आहेत. या जाहिरनामा प्रकाशनावेळी मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम व सुरजेवाला उपस्थित होते.