‘पुढच्या वेळेस अमित शहा तुम्हाला उत्तरे द्यायला परवानगी देतील’ : राहुल गांधीं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. यावरून राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलं कि, अभिनंदन मोदीजी! छान पत्रकार परिषद. पुढच्या पत्रकार परिषदेच्या वेळेस तरी अमित शहा तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायला परवानगी देतील. खूप छान!

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची पत्रकार परिषद सुरु असताना राहुल गांधी यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले कि मोदीजी, तुम्ही एवढी मोठी पत्रकार परिषद घेत आहात, आज मी पण तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही माझ्यासोबत राफेल प्रश्नावर चर्चा का नाही केली? मी तुम्हाला इतके सारे आव्हान दिले, तुम्ही स्वीकारले का नाहीत?

दरम्यान, मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळल्यामुळे विरोधक मोदींवर टीका करत आहेत.