शेतकरी आंदोलन : कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरणार काँग्रेस ? सोनिया गांधींनी बोलावली बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या (Congress)  अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi)  शनिवारी पार्टीचे महासचिव आणि प्रभारींसोबत शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा करतील. सूत्रांनुसार, शेतकरी आंदोलनाचे (Farmer Protest) समर्थन करण्याची रणनिती बनवण्यासाठी एक व्हर्च्युअल बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेस सुरूवातीपासूनच सप्टेंबरमध्ये केंद्राद्वारे लागू करण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलनात शेतकर्‍यांच्या बाजूने राहीली आहे.

सोनिया गांधी यांनी यापूर्वी एका वक्तव्यात म्हटले होते की, स्वातंत्र्यानंतर सध्याचे सरकार सर्वात अहंकारी सरकार आहे. केंद्राने हे कायदे रद्द करावेत, असा सल्ला सोनिया यांनी दिला होता.

सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस शेतकर्‍यांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारविरोधात आक्रमक होण्याची योजना बनवत आहे. या बैठकीत सोनिया गांधी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना रस्त्यावर उतरण्याचे आणि आंदोलन तीव्र करण्याचे आदेश देऊ शकतात.

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी शुक्रवारी काँग्रेस नेत्यांना राष्ट्रीय राजधानीच्या विविध सीमांवर तीन वादग्रस्त कृषी कायद्यांचा विरोध करताना म्हटले की, कृषी कायदे रद्द करण्याशिवाय दुसरे काहीही मान्य होणार नाही.

आंदोलनकर्त्यां शेतकरी संघटना आणि केंद्रामध्ये शुक्रवारी आयोजित आठव्या फेरीतील चर्चा सुद्धा अनिर्णायक झाली. पुढील फेरीतील बैठक 15 जोनवारीला होईल.