Congress Presidential Election | काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अशोक गेहलोत लढवणार, राजस्थानचे नेतृत्व कोणाकडे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) आणि खासदार शशी थरूर (MP Shashi Tharoor) यांच्यात काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी (Congress Presidential Election) लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता गेहलोत थेट यावर शिक्कामोर्तब केले आहे. आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Congress Presidential Election) अर्ज भरल्यानंतर राजस्थानचे नेतृत्व कोण करणार हे काँग्रेसचे नेतृत्व ठरवेल, असेही अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

 

22 वर्षानंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress Presidential Election) होत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याची भूमिका घेतल्यामुळे ही निवडणूक घेतली जात आहे. यामुळे अडीच दशकानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासून (24 सप्टेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याबाबत म्हटले की, मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायचे ठरवले आहे. राजस्थानमध्ये परतल्यानंतर मी उमेदवारी अर्ज कधी भरायचा ती तारीख ठरवणार आहे. पक्षामधील अंतर्गत लोकशाहीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण नवी सुरुवात करुया. देशातील सध्याची स्थिती पाहता एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्याची नितांत गरज आहे.

गेहलोत पुढे म्हणाले, काँग्रेसमधील अन्य नेत्यांनी सुद्धा निवडणूक लढवायचे ठरवले असल्यास माझी हरकत नाही.
निकाल हाती आल्यानंतर आम्ही काँग्रेस म्हणून सोबत काम करू, असा मला विश्वास आहे.
प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उदयास येण्यासाठी विचारधावेरच पुढे जायचे आहे.
काँग्रेसला ब्लॉक, गाव, जिल्हा स्तरावर मजबूत करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.

 

गेहलोत पुढे म्हणाले, मी जर काँग्रेसचा अध्यक्ष झालो तर राजस्थान काँग्रेसची जबाबदारी कोणाला सोपवायची
हे आमचे प्रभारी सरचिटणीस अजय माकन (Ajay Maken) आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) ठरवतील.

 

Web Title :- Congress Presidential Election | ashok gehlot official announced he will contest congress presidential election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

Jalgaon Accident News | जळगावमध्ये भीषण अपघात ! डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू

Eknath Shinde Group | शिंदे गटाचे हे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता