राहुल गांधीचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाले – ‘तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचे महान काम मोदी सरकार मोफत करतंय’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – वाढत्या इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचे महान काम मोदी सरकार करत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नाहीत, तर उलट घसरल्या आहेत असे म्हणत त्यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे.

 

 

 

 

 

राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते है, असे म्हणत मोदी सरकारवर घणाघात केला होता. तसेच जून 2014 मध्ये देशात भाजपाच सरकार आले, तेंव्हा कच्च्या तेलाच्या किंमती 93 डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेंव्हा पेट्रोल 71 तर डिझेल 57 रुपये प्रतिलिटर होते. गेल्या 7 वर्षांत कच्च तेल 30 डॉलरने स्वस्त झाले आहे. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी गाठत आहे आणि डिझेल त्याच्या पाठोपाठ जात असल्याचे गांधी यांनी म्हटले होते. 2021 मध्ये 19 वेळा ही दरवाढ झाली आहे. म्हणजेच 45 दिवसांत 19 वेळा किंमत वाढली आहे. 15 फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या काळात पेट्रोल 17.05 तर डिझेल 14.58 रुपयांनी महाग झाल आहे हे सांगणारी आकडेवारीच राहुल गांधी यांनी सादर केली होती.