जीन्स-टी-शर्ट … सिक्स पॅक अ‍ॅब्स …. दक्षिणेत राहुलच्या अंदाजात पाहायला मिळतोय बदल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पश्चिम बंगालसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रचारासाठी या राज्यांतील सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दक्षिण भारत, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांच्या निवडणूक प्रचाराची सूत्रे स्वीकारली आहेत आणि ते अगदी वेगळ्या शैलीत दिसत आहेत. उत्तर भारतातील राज्यातील कुर्ता-पायजामा घालून मंदिरात पूजा करताना दिसणारे राहुल गांधी दक्षिण भारतात बदलताना दिसत आहेत. कुर्ता-पायजामा ऐवजी जीन्स-टी-शर्ट आणि हाफ-शर्ट परिधान करुन नव्या रूपात आणि स्टाईलमध्ये राहुल प्रचार करताना दिसत आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी मच्छिमारांसह नावेत बसून समुद्राचा प्रवास करताना पाहायला मिळाले. त्यांनी मच्छीमारांशी त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली तसेच राहुल समुद्रात उडी मारत मच्छीमारांसह पोहताना दिसले. राहुल यांचा एक फोटोही यावेळी व्हायरल झाला, ज्यात त्यांचे सिक्स-पॅक अ‍ॅब्स दिसत होते. यांनतर राहुल यांनी सेंट जोसेफ स्कुलला भेट दिली. सेंट जोसेफ स्कूलमध्ये तेथील शिक्षकांसोबत पारंपारीक नृत्यासह राहुलने एका विद्यार्थ्यासह आइकिडो परफॉर्म केले. आयकिडो दाखविल्यानंतर मेरोलिन शेनिघा या दहावीच्या विद्यार्थिनीने राहुल गांधींना पुशअपसाठी अपील केले, त्यानंतर राहुल यांनी स्टेजवरच विद्यार्थिनींसह पुशअप केले. त्यांनी 9 सेकंदात 13 पुशअप्स नॉनस्टॉप केले. एवढेच नव्हे राहुल गांधींनी एका हाताने देखील पुशअप केले.

एवढेच नव्हे राहुल केरळमध्ये पुलाव आणि तामिळनाडूमध्ये मशरूम बिर्याणी बनवताना दिसले होते. निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी ‘ विलेज कुकिंग’ कार्यक्रमात सहभागी होऊन सदस्यांना प्रोत्साहित करताना दिसले. यावेळी निळा टीशर्ट परिधान केले राहुल बिर्याणी बनवताना देखील पाहायला मिळाले. याशिवाय रायता तयार करताना त्यांनी अनेक तमिळ शब्द वापरले. यानंतर राहुल यांनी जमिनीवर बसून केळीच्या पानावर बिर्याणीचा आनंद लुटला.

ज्येष्ठ पत्रकार शकील अख्तर म्हणतात की, राहुलला तो जसा आहे तश्याच नैसर्गिक मार्गाने दिसायचे आहे. जर ते दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रचार करीत असतील तर त्यांना तेथील लोकांशी थेट संपर्क साधायचा आहे. म्हणूनच, तेथील लोकांमध्ये जाऊन ते स्वत: ला नैसर्गिकरित्या त्याच प्रकारे दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी ज्येष्ठ पत्रकार युसूफ अन्सारी यांनी म्हंटले की, उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या राजकारणाची दिशा आणि दशा वेगवेगळी आहेत. 90 च्या दशकानंतर उत्तर भारतातील सर्व राज्यांनी धार्मिक अजेंडा असलेल्या राजकारणावर वर्चस्व राखले आहे. म्हणूनच उत्तर भारतातील सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही मंदिर आणि दर्ग्यात दिसतात, तर दक्षिण भारतातील राजकारण सामाजिक आणि शैक्षणिक मुद्द्यांवर अधिक आधारित आहे. म्हणूनच राहुल गांधी उत्तर भारतात आहेत, त्यानंतर ते मंदिरात भेट देत आणि पूजा करताना दिसतात, जेणेकरून बहुसंख्य लोकांना समाज संदेश देता येईल. त्याचबरोबर दक्षिण भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये जात आहेत.

यूसुफ अन्सारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे ज्वलंत भाषण देण्याची कला राहुल गांधींना येत नाही. म्हणूनच राहुल गांधी मोठ्या जाहीर सभेऐवजी लोकांशी थेट संवाद साधण्याचे धोरण अवलंबत आहेत. यासाठी ते कधीकधी शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, कधीकधी ते मच्छीमार आणि कधी छोट्या व्यापाऱ्यांशी संवाद साधताना दिसतात. आणि राहुलच्या ड्रेसविषयी बोलायचे झाले तर ‘जैसा देश, वैसा भेष’ ही उक्ती अचूक आहे. देशातील सर्व नेते तेच करतात, जिथे जातात तिथला पोशाख परिधान करून तिथल्या लोकांना त्यांच्याशी जोडलेले दाखवू शकतील.