‘गॅस सिलेंडर’ सह स्मृति इराणी यांचा फोटो ट्विट करून राहुल गांधी म्हणाले – ‘माझा पण पाठींबा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी च्या पराभवानंतर सबसिडी भेटणाऱ्या गॅस सिलेंडर च्या किंमती वाढल्याच्या संदर्भात काँग्रेस आक्रमक झाली आहे. याबाबत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आरसा दाखविला आहे.

राहुल गांधी यांनी स्मृती इरानी यांचा एक जुना फोटो देखील ट्विट केला आहे, ज्यात स्मुती इराणी आणि भाजपा कार्यकर्ता गॅस सिलेंडर सोबत जोरदार विरोध प्रदर्शन करताना दिसत आहे. स्मृती इराणी यांचा फोटो हा त्या काळचा आहे, जेव्हा केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकार होती.

युपीए सरकारच्या काळात सिलेंडरच्या किंमती वाढल्याने भाजपा सरकारने जोरदार विरोध प्रदर्शन केले होते. स्मृती इराणी देखील गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीविरोधात निदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत रस्त्यावर उतरल्या होत्या.

राहुल गांधी यांनी ट्विट केले की, ‘LPG सिलेंडर च्या किमती १५० रुपयांनी वाढवण्याच्या विरोधात प्रदर्शन करणाऱ्या भाजपाच्या या सदस्यांशी मी सहमत आहे.’ तसेच राहुल गांधींनी मोदी सरकारला गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्याच्या निर्णयाला परत घेण्यास देखील सांगितले.

बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा धक्का देत विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १५० रुपयांची वाढ केली. आता ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत १४४.५० रुपये, कोलकाता येथे १४९ रुपये, मुंबईला १४५ रुपये आणि चेन्नईला १४७ रुपये अधिक द्यावे लागतील.

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटनुसार, देशातील चार मोठ्या महानगरांमध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये आता एलपीजी सिलिंडर्सचे दर अनुक्रमे ८५८.५० रुपये, ८९६ रुपये, ८२९.५० आणि ८८१ रुपये झाले आहेत. गॅस सिलिंडरचा नवीन दरदेखील १२ फेब्रुवारीपासून लागू झाला आहे.

या अगोदर गॅस सिलेंडरच्या भावात १ जानेवारी २०२० ला वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १ फेब्रुवारी ला १४.२ किलोच्या विना अनुदानित सिलेंडरची किंमत बदलण्यात आली नव्हती, तर १९ किलो सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर गॅस सिलेंडरच्या किंमतीत ताजी वाढ झाली आहे.

११ फेब्रुवारीला जेव्हा दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आले तेव्हा आम आदमी पक्षाने मोठा विजय नोंदविला, तर भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकल्या, तर भाजपाला फक्त ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

You might also like