#लोकसभा निवडणूक २०१९ : काँग्रेसच्या मुकुल वासनिकांनी प्रसिद्ध केली १५ उमेदवारांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी उत्तर प्रदेशाच्या ११ तर गुजरातच्या ४ लोकसभा उमेदवाराची नावे जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे अमेठी मधून राहुल गांधी आणि रायबरेलीतून सोनिया गांधी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादी नुसार माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. ते फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. तर सहारनपुर लोकसभा मतदारसंघातून इमरान मसूद तर उन्नाव मतदारसांघातून अनु टंडन निवडणूक लढत आहेत. अकबरपूर लोकसभा मतदारसंघातून राजाराम पाल तर जालौन मतदारसंघातून बृजलाल खबरी निवडणूक लढणारा आहेत. तर तिकडे फैजपूर मधून निर्मल खत्री निवडणूक लढत आहेत.

दरम्यान आज सकाळी अखिलेश यादव यांना सपा बसपा गठबंधन मध्ये काँग्रेस का नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी काँग्रेस आमच्या सोबत आहे असे म्हणले होते. आम्ही त्यांना दोन जागा सोडत आहे. त्यात अमेठी आणि रायबरेली या दोन जागांचा समावेश आहे असे अखिलेश यादव म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यात काही तथ्य नव्हते हे काँग्रेसने जाहीर केलेल्या यादी वरून स्पष्ट झाले आहे.

असे आहेत काँग्रेसच्या लोकसभाचे पहिल्या यादीतील १५ उमेदवार

अहमदाबाद पश्चिम- राजू परमार (एससी), आणंद – भारतसिंग सोलंकी, वडोदरा – प्रशांत पटेल, छोटा उदयपूर (एसटी) – रणजीत मोहनसिंग रठवा, सहारनपूर – इम्रान मसूद, बदाऊ – सलीम इक्बाल शेरवानी, धौरहरा – जतीन प्रसाद, उन्नाव – अन्नू टंडन, बरेली – सोनीया गांधी, अमेठी -राहुल गांधी, फारुखाबाद – सलमान खुर्शीद, अकबरपूर – राजराम पाल, जलौन (एससी) – ब्रीज लाल काबरी, फरझीदाबाद – नीर्मल खतरी, खुशी नगर – आर.पी.एन. सिंग

 

ह्या हि बातम्या वाचा

वाह रे पालकमंत्री ; ‘त्या’ अहवाल प्रकाशनानंतर गिरीश बापट सोशल मीडियावर ट्रोल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तयारीसंदर्भात ‘स्वीप’आणि ‘पीडब्ल्यूडी’ सुकाणू समितीची बैठक संपन्न

राहुल गांधींचा भारतीय हवाई दलापेक्षा पाकिस्तानवर अधिक विश्वास