Sachin Pilot | गेल्या 6 महिन्यात पेट्रोलच्या किंमती 66 वेळा वाढल्या, काँग्रेसचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गेल्या काही दिवसापासून इंधन दरात (Fuel rate) वाढ होत आहे. पेट्रोलने शंभरी पार केली असून देशाच्या अनेक राज्यात इंधन दरवाढीचा भडका सुरुच आहे दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने (Petrol Price) शंभरी पार केली असून अजूनही त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीवरून काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Congress leader Sachin Pilot) यांनी मोदी सरकारवर (Modi government) निशाणा साधला आहे. congress sachin pilot targets cental government over rising prices petrol diesel and farm bill

डेहराडूनमध्ये काँग्रेस (congress) नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पायलट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेल्या सहा महिन्यात पेट्रोलच्या किमतीत ६६ वेळा वाढ झाली.
इंधन दरात वाढ झाल्याने सर्वच गोष्टी महाग होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर होतो आहे.
आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol and diesel Price) तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत अशा शब्दांत पायलट यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
पेट्रोल दरवाढीचा महागाईवर परिणाम होत आहे.
पुरेसं अन्न देखील अनेक कुटुंबांना मिळत नाही.
यावरूनच केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचंच धोरण असल्याचं दिसून येत असल्याच पायलट यांनी म्हटलं आहे.
याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

 

… मोदी सरकार कर वसुलीवर चालत

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोना व्हायरस, लस आणि विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
त्यानंतर आता वाढत्या इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
ट्विटरवरून ट्विट करताना तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं अशा शब्दांत राहुल यांनी बोचरी टीका केली आहे.

Web Title : congress sachin pilot targets cental government over rising prices petrol diesel and farm bill

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

Monkeypox in US | कोरोनादरम्यान नवीन संकट ! अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आढळली दुर्मिळ ‘मंकीपोक्स’ची केस

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार