महाजन, मुंडे यांच्या बाबतचे ‘ते’ ट्विट वादाच्या शक्यतेने सचिन सावंत यांनी केले डिलिट ; स्क्रिनशाॅट व्हयरल..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधीचा जीवन प्रवास संपला अशी विखारी टिका केली होती. त्यावर काँग्रेससह इतर विरोधकांनी कडाडून टिका केली होती. त्याला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करुन दिला होता. मात्र, त्यावरुन वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी ते डिलिट केले आहे. त्याचा स्किन शॉट आता व्हायरल होत आहे.

हे ट्विट डिलिट करताना सचिन सावंत यांनी दुसरे ट्विट करुन सांगितले की, आज ज्या पातळीवर भाजपा आणि मोदी, जेटली सारखी मंडळी घसरुन राजीव गांधी वर टिका करत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. याचकरीता ट्विट केले होते. परंतु आता डिलीट करत आहे. असंस्कृतांबरोबरही संस्कृती राखणे ही भित्रेपणाचे लक्षण नसून त्यातच शौर्य असते.
नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्यासाठी सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर म्हणून ट्विट केले. त्यात महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे देशासाठी गेले, तर मग महाजन, मुंडे कशासाठी गेले? असा सवाल केला होता. त्यांच्या ट्विटचा स्क्रिन शॉट सोशल मिडियावर व्हायरल झाला.

हा स्क्रिन शॉट व्हायरल होण्यास सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच सावंत यांनी ते ट्विट डिलिट केले. व त्यामागचे कारणही सांगितले. मात्र, पहिल्या ट्विटमुळे वाद होण्याची शक्यता असल्यामुळे सावंत यांनी ट्विट डिलिट केल्याची चर्चा सुरु झाली आहे.