भाजपचा IT सेल कंगनाच्या टीमचा भाग, काँग्रेसचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगनाचा बोलविता धनी भाजप असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. कंगना टीम म्हणजे कंगना+भाजप आयटी सेल असून तिचे ट्विट, वक्तव्यांमागे भाजप आहे असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

कंगना टीम म्हणजे कंगना+भाजप खढ सेल असून कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील 106 हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे. असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.

महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. येथे सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजप कार्यालयात 53 वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील, असेही ते म्हणाले आहेत.