तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकली तरी लोकांना तुरुंगात डांबता आणि आम्हाला प्रवचन देताय, भाजपवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली तरी भाजप लोकांना तुरुंगात डांबत आहे. आता तोच भाजप आम्हाला स्वातंत्र्याविषयी प्रवचन देऊ लागल्याचा पलटवार काँग्रेसने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा .( BJP president JP Nadda) यांनी सोमवारी महाराष्ट्रात स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे वक्तव्य केले होते.या वक्तव्याचा समाचार घेत  काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत ( (Sachin Sawant) यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपची जी लोक आहेत ती उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचा कारभार करत असल्याचे त्यांनी म्हटले
सावंत म्हणाले, गेल्या सहा वर्षात पत्रकारांवर दबाव आणण्यात आला, त्याविषयी लोकांना माहिती आहे. पंतप्रधानांनी पत्रकारांना बाजारू म्हटल्याचेही देशाने ऐकले आहे. देशात जवळपास 233 लोकांवर देशद्रोहाचा गुन्हे  दाखल केले आहेत. तर पत्रकारांवरील हल्ल्यातही वाढ झाली आहे. केवळ सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकल्यानंतर लोकांना जेलमध्ये टाकणारे हे सरकार आहे आणि आता ते प्रवचन देतात हे आश्चर्यच वाटते, असा टोला सावंत यांनी जे.पी. नड्डा यांना लगावला.

यावेळी  सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचेही समर्थन केले. महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे भिन्न विचारसरणीचे पक्ष आहेत. ही बाब आम्हाला मान्य आहे.परंतु भाजप हा लोकशाहीसाठी कशा पद्धतीने मारक ठरला आहे आणि लोकशाहीसमोरचे संकट आपल्याला दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपच सत्तेवर येऊ नये आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा विकास साधता यावा यासाठी आम्ही सरकार स्थापन आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे तो त्यांचा प्रश्न असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
You might also like