पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये बहुचर्चित कसबा मतदार संघातून नगरसेवक अरविंद शिंदे तर शिवाजीनगर मतदार संघातून माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांची उमेदवारी जाहीर केली. शिंदे यांच्या उमेदवारी मुळे रविंद्र धंगेकर यांचा पत्ता कट झाला असून या मतदार संघामध्ये महापौर विरुद्ध गटनेता अशी लढत पाहायला मिळणार आहे.
कसबा मतदार संघातून सलग पाचवेळा आमदार असलेले गिरीश बापट हे लोकसभेत गेल्याने महापौर मुक्ता टिळक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. बापट यांच्यासमोर अनेकवर्षं नशीब आजमावून पाहण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विरोधकांना यामुळे बळ मिळाले. अशातच यापूर्वी मनसे कडून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवणारे रविंद्र धंगेकर यांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि सलग चवथ्या वेळी नगरसेवक झाले. विशेष असे की मागील दहा वर्षापासून त्यांनी कसबा मतदार पिंजून काढल्याने त्यांचे नाव आघाडीवर होते.
The Congress Central Election Committee has selected following candidates for the ensuing general elections to the Legislative Assembly of Maharashtra. Former Chief Minister of Maharashtra Prithviraj Chavan will be contesting polls from Karad South constituency. pic.twitter.com/dWZZQsFNPA
— ANI (@ANI) October 1, 2019
दरम्यान मागील 7 वर्षे पालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आक्रमक भूमिका बजावली आहे. अभ्यासू आणि चतुरस्त्र नगरसेवक म्हणून त्यांचा पालिकेत दबदबा आहे. काँग्रेस चे जेमतेम दहा नगरसेवक असताना 100 नगरसेवक असलेल्या भाजपला कायमच अडचणीत आणले आहे. विशेष असे की लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी मागितली होती. शेवटपर्यंत त्यांचे नाव चर्चेत होते. ती संधी त्यांना विधानसभेत देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
शिंदे हे कसबा मतदार संघाच्या लगत असलेल्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात प्रतिनिधित्व करतात. यामुळे कसबा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दोन दिवसांपूर्वी बाहेरचा उमेदवार नको या आशयाचे फलक लावले होते. या नाराज मंडळींना आपल्याकडे वळविणे हे शिंदे यांच्यापुढे खरे आव्हान आहे. तसेच गिरीश बापट आणि अरविंद शिंदे हा राजकीय सामना नेहमीच रंगला आहे. यापार्श्वभूमीवर बापट किती ताकद उभी करणार यावर मुक्ता टिळक यांची लढत अवलंबून राहणार आहे. कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील विधानसभा होणार्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी खालील उमेदवारांची निवड केली आहे-
1.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण)
2.राजेश एकडे (मलकापूर)
3.राहुल सिद्धिविनायक बोंद्रे (चिखली)
4.श्रीमती. स्वाती संदीप वाकेकर (जळगाव -जामोद)
5.संजय रामदास बोक्के (अकोट)
6.विवेक रामराव पारस्कर (अकोला पूर्व)
7.श्रीमती. रजनी महादेव राठोड (वाशिम-एससी)
8.अनिरुद्ध सुभानराव देशमुख (अचलपुर)
9.शेखर प्रमोद शेंडे (वर्धा)
10.राजू देवनाथ परवे (उमरेड-एससी)
11.गिरीश कृष्णराव पांडव (नागपूर दक्षिण)
12.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम)
13.सहासराम कारोटे (आमगाव-एसटी)
14.आनंदराव गेडाम (आरमोरी-एसटी)
15.डॉ. चंदा नितीन कोडावते (गडचिरोली एसटी)
16.सुभाष आर. धोटे (राजुरा)
17.डॉ विश्वास आनंदराव झाडे (बल्लारपूर)
18.वामनराव बी. कासार (वणी)
19.वसंत चिंदूजी पुरके (राळेगाव)
20.अॅड. शिवाजीराव एस. मोघे (आर्णी – ST)
21.विजय वाय. खडसे (उमरखेड- SC)
22.भाऊराव बाबूराव पाब (हिंगोली)
23.सुरेशकुमार जेठालिया (परतूर)
24.गोरात्याल कैलास किसनराव (जालना)
25. डॉ. तुषार शेवाळे (मालेगाव ओतुर)
26. शिरीषकुमार वसंतराव कोतवाल (चांदवड)
27. हिरामण खोसकर (ईगतपूरी)
28. शोएब असफाक (भिवंडी)
29. कांचन योगेश कुलकर्णी
30. राधिका मिलींद गुप्ते (डोंबेवली)
31. कुमार शंकरराव खिलारे (बोरेवली)
32. अरुन वसंत सावंत (दहिसार)
33. गोविंद वसंतराम सिंह (मुलंड)
34. सुनिल बिसन कुमरे (जोगेश्वरी पुर्व)
35. अजंता राजपती यादव (कांदिवली पुर्व)
36. काळू करमनबाई बुढेलीया (चारकोप)
37. युवराज मोहिते (गुरवाग)
38. जगदिश अमिन (अंधेरी पुर्व)
39. जयंती जिवाबाई सिरोया (विलेपार्ले)
40. प्रविण नाईक (माहिम)
41. उदय विठ्ठल फानसेकर (शिवडी)
42. हिरा निवाजी देसाई (मुलबार हिल)
43. डॉ. मनिष अंनत पाटिल (उरण)
44. नंदा राजेंन्द्र मात्ते (पेन)
45. दत्तात्रय रंगनाथ बहिरट (शिवाजीनगर)
46. अरविंद तुकाराम शिंदे (कसबा पेठ)
47. धिरज विलासराव देशमुख (लातुर ग्रामिण)
48. दिलीप रोहिदास भालेराव (उमरगा)
49. पृथ्विराज चव्हाण (कराड दक्षिण)
50. अविनाश शातांराम लाड (राजापुर)
51. पृथ्विराज गुलाबराव पाटिल (सांगली)
52.राहुल पी खंजीरे (इचलकरंजी)
Visit : policenama.com
- रूबाबदार व्यक्तीमत्वासाठी पुरूषांनी फॉलो करावा ‘हा’ पारंपारिक ‘फॉर्मूला’
- पुरूषांनी ‘या’ १० गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास बिघडू शकते आरोग्य, अशी घ्या काळजी
- ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी पुरूषांनी ‘हे’ सेवन करावे, अशी आहे पद्धत
- सावधान ! जेवणानंतर थंड पाणी पिताय का ? रोग प्रतिकारकशक्ती होते कमी
- ‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या
- ‘या’ सेक्ससंबंधीच्या समस्यांपासून ‘कंडोम’ देखील वाचवू शकत नाही, जाणून घ्या
- ‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या