काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत जाऊ नये : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भाजपला सत्तेतून घालविण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्याचा विषय समोर आणला, त्यासाठी दोन बैठकाही झाल्या. २००४ पासून काँग्रेस उमेदवार पराभूत होत असलेल्या २२पैकी १२ लोकसभा मतदारसंघाच्या जागा आम्ही मागितल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसचा फोन येणे बंद झाल्यामुळे एमआयएमशी युती केली. अजूनही आपण काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. राफेल विमान खरेदी सौद्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार भूमिका मांडत आहेत. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत जाता कामा नये, अशी भूमिका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d079243c-c857-11e8-9a95-4335698badae’]

आंबेडकर म्हणाले, आमची लढाई ही भाजप व रा. स्व. संघाशीच आहे. त्यासाठीच ओवेसी बंधूंच्या एमआयएमसोबत युती केली. महाराष्ट्रात काँग्रेसने पराभूत झालेल्या २२ लोकसभेच्या जागांपैकी १२ जागा आम्हांला द्याव्यात. भारतीय जनता पक्षाला फायदा करण्यासाठी आम्ही एमआयएमसोबत राजकीय मैत्री केल्याचा विरोधकांचा आरोप खोटा आहे. भाजपला सत्तेतून घालविण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्याचा विषय समोर आणला, त्यासाठी दोन बैठकाही झाल्या. २००४ पासून काँग्रेस उमेदवार पराभूत होत असलेल्या २२ पैकी १२ लोकसभा मतदारसंघाच्या जागा आम्ही मागितल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसचा फोन येणे बंद झाल्यामुळे एमआयएमशी युती केली. अजूनही आपण काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. राफेल विमान खरेदी सौद्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार भूमिका मांडत आहेत. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत जाता कामा नये, असे आंबेडकर म्हणाले.

आघाड्या कायम राहिल्यास सत्तापरिवर्तन, एबीपी माझा, सी व्होटर सर्वेक्षण

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होण्यास रा. स्व. संघ आणि भाजपची धोरणे जबाबदार आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी केला. व्यापार, धंदा व अन्य मार्गाने संपत्ती कमावणारी ३ लाख ३ हजार ४०० कुटुंबे देशाच्या ५० टक्के संपत्तीचे मालक आहेत. त्यापैकी सुमारे ७५ हजार कुटुंबे भारतीय चलन डॉलरमध्ये रुपांतरित करून परदेशात वास्तव्यासाठी जात आहेत. अन्य देशात स्थलांतरित होणारी बहुतांश कुटुंबे हे हिंदूच आहेत. अशा लोकांमुळेच डॉलरची मागणी वाढली असून, चुकीच्या आर्थिक धोरणाच्या भीतीपोटी देश सोडून जाणाऱ्यांची संख्या भविष्यात वाढणार आहे असे भाकित त्यांनी केले.

[amazon_link asins=’B008ZXS7PY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’46b6274a-c858-11e8-b74e-15eb21e460c5′]