मोदींनी अक्षय कुमारला युद्धनौकेवर नेलं होत, ते कसं चालतं ; काँग्रेसचा मोदींना सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराट ही युद्धनौका सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी वापरली असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेदरम्यान बोलताना केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देत काँग्रेसचा सोशल मीडिया विभाग सांभाळणाऱ्या दिव्या स्पंदना यांनी मोदींवर पलटवार केला आहे. मोदी आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेवर अभिनेता आणि कॅनडाचा नागरिक अक्षय कुमारला घेऊन गेले होते, असा दावा त्यांनी केला आहे सोबत पुरावा म्हणून अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरील फोटो ट्विट केले आहे. कॅनडाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी आयएनएस सुमित्रावर घेऊन गेले होते. ते कसं काय चाललं, असा सवालही स्पंदना यांनी उपस्थित केला आहे.

दिव्या स्पंदना यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘हे योग्य होते का ? मोदीजी तुम्ही कॅनडाचा नागरिक अक्षय कुमारला आयएनएस सुमित्रावर घेऊन गेला होतात. या ट्विटमध्ये त्यांनी ‘सबसे बंद झूठा मोदी’ असा हॅशटॅगही वापरला आहे. तसेच नरेंद्र मोदी व अक्षय कुमार यांना टॅग केले आहे.

स्पंदना यांनी त्यांच्या ट्विटच्या लिंकमध्ये आयएनएस सुमित्रावरील कार्यक्रमाची बातमीही शेअर केली आहे. ‘२०१६ मध्ये विशाखापट्टणममध्ये इंटरनॅशनल फ्लिट रिव्ह्यूला अक्षय कुमार पत्नी व मुलासोबत उपस्थित होता. शिवाय अक्षय कुमारने नौदलाचे अधिकारी आणि इतर प्रमुख पाहुण्यांच्या सोबत आयएनएस सुमित्रा चालविल्याचा खळबळजनक दावाही केला आहे.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी
बुधवारी रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता.