गांधी कुटूंबाचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठिंबा द्यावा अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात येत असताना काँग्रेस हायकमांडचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याचे कळते आहे.

काही वेळापूर्वीच काँग्रेस नेते अहमद पटेल यांची मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई यांच्याशी भेट झाली. या भेटीत जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. काही वेळाने आता काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे. यात अहमद पटेल शिवसेनेने मांडलेले मुद्दे सोनिया गांधी समोर मांडतील असे सांगण्यात येत आहे, परंतू त्या आधी काँग्रेस हायकमांड शिवसेनेला पाठिंबा देण्यास इच्छूक नसल्याचे कळते आहे.

राज्यात सत्ता स्थापनेवरुन कलगीतुरा रंगाला असताना राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यामध्ये खलबतं सुरु आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते शिवसेनेला पाठिंबा देण्यास ठाम आहेत. राष्ट्रवादीबरोबर देखील नुकतीच शिवसेनेची बैठक पार पडली.

शिवसेनेकडून राष्ट्रवादीला शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा त्यासाठी पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शरद पवारांबरोबर पहिलीच भेट मुंबईत ताज लांड्स एन्डवर पार पडली. शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव देण्यात आला आहे. पाठिंब्यासाठी शरद पवारांना विनंती करण्यात आली आहे. परंतू बैठक पार पडल्यानंतर कोणत्याही पक्षांच्या नेत्यांकडून प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यास टाळण्यात आले. परंतू आता बैठकीनंतर काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे.

Visit : Policenama.com