काँग्रेस सांगत होती ‘तंगी’ आहे – ‘फंड’ नाही, लोकसभा 2019 मध्ये खर्च केले 820 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस वारंवार आमच्याकडे फंड कमी आहे असा ओरडा करत होती. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने केलेल्या खर्चाची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तेलंगना, ओडिशा आणि सिक्किम या राज्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तब्बल 820 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असल्याचे समजते.

2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने निवडणुकांसाठी 516 कोटी रुपये इतका खर्च केला होता. भाजपने 2014 च्या निवडणुकीत 714 कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखवले होते. मात्र 2019 मध्ये झालेल्या खर्चाचा हिशोब अद्याप भाजपने दिलेला नाही.

काँग्रेसने निवडणूक आयोकडे 31 ऑक्टोबर रोजी आपली खर्चाबाबतची सर्व माहिती सोपवली. काँग्रेस पक्षाने प्रचारासाठी 626.3 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले आहे. तर 193.9 कोटी रुपये उमेदवारांसाठी खर्च झाल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते सर्व प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत काँग्रेसने एकूण 856 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे.

बाकी पक्षांमध्ये लोकसभेसाठी तृणमूल काॅंग्रेसने 83.6 कोटी रुपये, बहुजन समाज पार्टीने 55.4 कोटी रुपये राष्ट्रवादीने काँग्रेसने 72.3 कोटी 73.1 लाख रुपये इतका खर्च केला होता.

Visit : Policenama.com