काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना अश्लील ट्विट करणारा अटकेत 

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या ट्विटर हॅण्डलवर धमकी देणाऱ्या तसेच अश्लील भाषेत ट्वीट करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुजरात मधील अहमदाबाद जिल्ह्यातून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रियांका यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात ३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोरेगाव पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०६ (२), ५०९, आयटी ऍक्ट आणि पॉक्सो कायद्यान्वये या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जय श्री राम असे नाव असलेल्या आणि  @girishk1605 या ट्विटर हॅण्डलहून काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना  ‘मला तुझ्या मुलीवर बलात्कार करायचा आहे, तिला माझ्याकडे पाठव’ अशा आशयाचे ट्विट करण्यात आले होते. असे ट्विट मिळताच प्रियांका यांनी अज्ञात इसमाविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज अहमदाबाद येथून एका आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. आरोपी हा अहमदाबाद जिल्ह्यातील बावला शहरात राहणार आहे. आज रिमांडसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जाहिरात