काँग्रेसला मोठा धक्का ; ‘या’ महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

काँग्रेस प्रवक्ता शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आठ पदाधिकाऱ्यांना पक्षात परत घेतल्यामुळे त्या पक्षावर नाराज होत्या. काँग्रेसमध्ये गुंडांना स्थान दिलं जातं असं म्हणत दोन दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. तसेच त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असून शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एका पत्रकार परिषदेत चतुर्वेदी यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं होतं. त्या कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचं निलंबन केलं होतं. मात्र, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्यावरची कारवाई मागे घेत त्यांची पदावर वर्णी करण्यात आली. महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी ट्विटरवर काँग्रेसविषयी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

Image result for प्रियंका चतुर्वेदी

ट्विटमध्येत्यांनी म्हंटल होतं की, ‘काही माणसं मेहनत करुन पक्षात आपलं स्थान निर्माण करतात. मात्र त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींना पक्षात प्राधान्य दिलं जातं. मी पक्षासाठी टीकेचा सामना केला. दगड झेलले. मात्र तरीही उलट पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या. जे लोक धमक्या देत होते, ते वाचले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे.’ या संदर्भातलं एक पत्रदेखील त्यांनी रिट्विट केलं होतं. त्यानंतर त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मे २०१३ मध्ये प्रियंका चतुर्वेदी यांची काँग्रेस प्रवक्त्या म्हणून निवड झाली होती. प्रियंका चतुर्वेदी यांनी डीएनए, तेहलका, फर्स्टपोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे.

Loading...
You might also like