पालघरच्या मॉब लीचिंग वरून पेटलंय ‘राजकारण’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – पालघर मध्ये झालेल्या मॉब लीचिंग वरून राज्यात राजकारणाला नवे रंग चढू लागले आहेत. पालघर मध्ये मॉब लीचिंग मुळे साधूची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून याविषयीची शहानिशा केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटवर ट्विट करून भाजपावर जोरदार हल्ला चढवला .

सचिन सावंत आपल्या ट्विट मध्ये म्हणाले मॉब लीचिंगचे केंद्र असलेल्या युपीच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करणे शहाणपणाचे आहे का?. तसेच ते ट्विट मध्ये म्हणाले गडचिंचले ग्रामपंचायत हा भाजपचा बालेकिल्ला असून तिथे गेली अनेक वर्ष भाजपचा सरपंच आहे तसेच सध्या चित्रा चौधरी या तिथल्या सरपंच आहेत. तसेच लीचिंगच्या प्रकरणात अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांची नावे पुढे आलेली आहेत आणि काहींना याआधी अटकही झाली आहे. तसेच सावंत म्हणाले कि काही मुस्लिम वेषांतर करता मुले पळवतात विहिरी मध्ये थुंकतात अशा अफवा पालघर मध्ये पसरवणारे नक्की कोण ? अशा अफवा पसरवून समाजात दुफळी निर्माण करण्याचे राजकारण खेळले जात आहे. या सर्वांची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी देखील सचिन सावंत यांनी यावेळी केली.

आता सचिन सावंत यांच्या या ट्विट ला महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधकांचे काय प्रतिउत्तर मिळेल हे देखील बघण्यासारखे असेल.