‘लव्ह जिहाद’च्या नावावर गळा काढणाऱ्यांनो थोडी तरी लाज बाळगा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा भाजपला टोला

पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादचा (Love Jihad) हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावरुन आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Congress spokesperson Sachin Sawant) यांनी लव्ह जिहादच्या नावावर गळा काढणा-यांने थोडी तरी लाज बाळगा असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे. मुक्तार अब्बास नक्वी ( Mukhtar Abbas Naqvi) यांच्या पत्नी सीमा आणि शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांच्या पत्नी रेणू या दोघीही हिंदू आहेत. हाच मुद्दा उचलून धरत त्या दोघांनी केल तर ते लव्ह आणि इतरांनी केले तर ते लव्ह जिहाद अस ट्विट करत सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही असा कायदा आणला जावा अशी मागणी भाजपाने केली आहे. तससेच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रातही आणावा, अशी मागणी केली होती. त्यावरुन सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

लव्ह जिहादवरून भाजपचे केवळ राजकारणः पेडणेकर
लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या प्रकरणावर बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, लव्ह जिहाद हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे. भाजपा या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.