‘आनंदोत्सव’ ! काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल साखर वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी साखर वाटप आज अभिनव चौक येथे करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. जेष्ठ स्वतंत्रसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते नागरिकांना साखर वाटप करण्यात आले.

यावेळी जेष्ठ स्वतंत्रसैनिक माधवराव माने म्हणाले, आम्ही निस्वार्थीपणे काँग्रेसचे काम केले आहे व करत राहणार तेही कुठल्याही पदाची अपेक्षा न करता. काँग्रेस बरोबर राहण्याची सच्चा कार्यकर्त्यांची गरज आहे. नवीन लोकांना संधी जरूर मिळेल.

या प्रसंगी संजय बालगुडे, शांतीलाल सुरतवाला, रामदास मारणे, ऋषिकेश बालगुडे, बाबू पडळकर, राजेंद्र मासुळे, रुपेश परदेशी, सुकदेव शिंदे, अप्पा शेवाळे, बाळासाहेब शिवरकर, मिलिंद काची, प्रकाश पवार असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संजय बालगुडे (म. प्र. काँग्रेस कमिटी) यांनी केले.