राज्यात आघाडीचे 14-14 मंत्री अन् 2 उपमुख्यमंत्री, काँग्रेसनं सांगितला ‘फॉर्म्युला’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेला प्रचंड वेग आला आहे. भाजपानं सत्तास्थापन करणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर राज्यपालानं शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. आज (सोमवार) संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी शिवसेनेला दिला आहे. दरम्यान, शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेसच्या निर्णयानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेईल असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आघाडीचे 14-14 मंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असतील असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड राज्यातील प्रमुख 6 नेत्यांशी चर्चा करून शिवसेनाला पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे.

राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांची सोनिय गांधी यांच्यासोबत चर्चा होत आहे. त्यानंतरच काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बैठकांवर बैठका होत आहेत. दरम्यान, आघाडीला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 14-14 मंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पद द्यावी असा फॉर्म्युला काँग्रेसनं सुचवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Visit : Policenama.com