अदिति सिंह यांना काँग्रेस पक्षानं केलं तडकाफडकी निलंबीत, भाजपा रायबरेलीसाठी करतेय तयारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : यूपीमधील रायबरेलीच्या कॉंग्रेसच्या आमदार अदिती सिंग यांनी बुधवारी बसेसच्या प्रश्नावर भाजपाची भूमिका घेत पक्षालाच लक्ष्य केले. त्यांनी प्रियंका गांधींवर टीका करत म्हटले की संकटाच्या वेळी निम्न स्तरावरील राजकारणाची काय गरज होती. काँग्रेस पक्षाने याची गंभीर दखल घेत कॉंग्रेसच्या आमदार अदितीसिंग यांना पक्षाच्या महिला शाखेच्या सरचिटणीस पदावरून निलंबित केले आहे. त्याचबरोबर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या रायबरेली संसदीय जागेसाठी भाजपा अदिती सिंग यांना तयार करत आहे.

त्या म्हणाल्या होत्या की, 1000 बसेसची यादी देण्यात आली होती, त्यातील निम्म्या तर बनावट होत्या. हा क्रूर विनोद का? जर तुमच्याकडे बसेस असतील तर तुम्ही त्यांना राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात का पाठविले नाही? तसेच कॉंग्रेसच्या आमदार म्हणाल्या, ‘जेव्हा कोटामध्ये हजारो मुले अडकली होती, तेव्हा राजस्थान सरकार त्यांना सीमेवर सोडू शकत नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलांना घरी पोहोचवण्याची सोय केली.’

विधानसभेत प्रलंबित आहे नोटीस

आदित्य सिंग यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉंग्रेसचे सचिव आणि रायबरेली प्रभारी केएल शर्मा म्हणाले की गेल्या वर्षी विधानसभेत त्यांच्याविरोधात नोटीस बजाविण्यात आली होती. पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना नोटीस देण्यात आली होती. ते म्हणाले, ‘त्या उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत आणि सभापती कार्यवाही देखील करत नाहीत.’ त्यांना आमदारपदावरून अपात्र ठरविण्याची विनंतीही पक्षाने केली आहे.

रायबरेलीसाठी अदिती सिंग यांना भाजपा करत आहे तयार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायबरेली संसदीय जागेसाठी भाजपा अदिती सिंग यांचे पालन पोषण करीत आहे. जो की कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. अदिती सिंग यांचे वडील स्वर्गीय अखिलेश प्रताप सिंह आमदार होते आणि एकदा त्यांनी लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. पण नंतर ते कॉंग्रेसमध्ये परतले. 2004 पासून अमेठीतील लोकसभा सदस्य असलेल्या सोनिया गांधी या रायबरेलीत गेल्या. परंतु अदिती सिंग पक्षात आल्या तेव्हाच रायबरेलीची विधानसभेची जागा कॉंग्रेसला जिंकता आली. यापूर्वी त्यांचे वडील बहुतेक वेळा या जागेवरुन अपक्ष आमदार होते.

अमेठीची जागा आता भाजपाच्या ताब्यात आहे

2019 मध्ये भाजपने सोनिया गांधीविरूद्ध एमएलसी दिनेश सिंग यांना मैदानात उतरवले, परंतु त्यांचा पराभव झाला. त्यावेळी अदिती सिंग आणि त्यांचे वडील कॉंग्रेस सोबत होते. त्याचवेळी 2019 मध्ये कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी येथे राहुल गांधींचा पराभव करून भाजपने ही जागा जिंकली. त्यानंतर अमेठीच्या संजय सिंग यांनी पक्ष सोडला होता.