Amul डेअरी निवडणूक : 11 पैकी 8 जागांवर काँग्रेसचा विजय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गुजरात राज्यामधील प्रसिद्ध कायरा डिस्ट्रिक्ट कोआपरेटिव मिल्क प्रोडक्शन यूनियन लिमिटेडचे (अमूल डेअरी नावने लोकप्रिय) प्रतिनिधित्व करणार्‍या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 11 पैकी 8 जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुकीमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. भाजपाचे वर्चस्व असणार्‍या गुजरातमध्ये काँग्रेसची ही कामगिरी विशेष मानली जात आहे.

अमूल डेअरी सोसायटी विभाग परिसरामध्ये काल करण्यात आलेल्या मतमोजणीमध्ये भाजपाचे आमदार केसरसिंह सोलंकी यांचा संजय पटेल यांनी पराभव केला. पटेल यांनी 2017 साली सोलंकींविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याचबरोबरच आनंदमधून काँग्रेसचे आमदार कांती सोढा परमार यांनी 41 मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. तर बोरसदमधून काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिन्हा परमार हे बोरसद-अंचल या जागेवरुन निवडून आले आहेत.

राजेंद्रसिन्हा परमार हे अमूलचे उपाध्यक्षही आहेत. काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजय मिळवलेल्यांमध्ये खम्भातमधून सीता परमार, पेटलादमधून विपूल पटेल, कथललमधून घीला जला, बालासिनोरमधून राजेश पाठक आणि महमदवदमधून गौतम चौहान यांचा समावेश आहे. स्थानिक पातळीवर या निवडणुकांना अधिक महत्व आहे. या निवडणुकांमध्ये विजय ठरलेल्या पक्षाला थेट ग्रामीण भागातील नागरिकांशी आणि खास करुन दुध उत्पादकांशी संबंधित प्रश्नांसंदर्भात काम करता येते. त्यामुळेच गुजरामध्ये अमुलच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे.