काँग्रेसने मानले भागवतांचे आभार, फलकाची सर्वत्र चर्चा  

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन

दिल्लीतील कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काँग्रेसच्या कार्याचे कौतुक केल्यानंतर चंद्रपूर जिल्हा-शहर काँग्रेस समितीने गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील प्रमुख चौकात भागवतांचे आभार मानणारे फलक लावले होते. या फलकामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून भाजपसाठी मात्र भागवतांना मानलेले आभार डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f2ad561c-c076-11e8-bdd4-ff61ea93a05d’]

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस नेत्यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले असून अनेक थोर व महान नेते याच पक्षाने भारताला दिले आहेत. या शब्दात त्यांनी दिल्लीत विविध विषयांवर मार्गदर्शन करताना अनपेक्षितपणे काँग्रेसवर कौतुकाचा वर्षाव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे विविध मुद्द्यांवरून दररोज काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका करत असताना भागवतांनी काँग्रेसचे कौतूक केल्याने भाजपची गोची झाली आहे.

[amazon_link asins=’B07DB6TKWC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’07d3c44a-c077-11e8-ae0e-a5f174868afc’]

शहरात लागलेल्या काँग्रेसच्या या फलकांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर म्हणाले, द्वेषाचे राजकारण सर्वत्र वेगाने पसरत असताना भागवतांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो व  त्यांचे आभार मानतो. दरम्यान, काँग्रेसने सरसंघचालकांचे छायाचित्र वापरून लावलेले हे फलक भाजपसाठी चांगलीच डोकेदुखी ठरले आहेत. त्याचमुळे की काय गिरनार चौकात लावलेला एक फलक अज्ञात व्यक्तीने फाडून टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा काँग्रेसमुक्त देशाची भाषा करत असताना भागवतांनी केलेले विधान लक्षवेधी ठरले आहे.

पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा भाजपला गोव्यातील सत्ता महत्वाची : शिवसेना