काँग्रेसची उद्या दुष्काळ आढावा बैठक

औरंगाबाद : पोलीसनामा

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शनिवारी औरंगाबाद येथे तातडीची आढावा बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार या बैठकीमध्ये संबंधित जिल्ह्यांमधील नेत्यांकडून दुष्काळी परिस्थितीची माहिती घेऊन त्यासंदर्भात करायच्या उपाययोजनांची चर्चा करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca0ae8f1-cdd9-11e8-9485-2b2db4533b1c’]

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वरिष्ठ नेते व विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते तर मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व इतर प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत यापूर्वी शेतकऱ्यांवर आलेल्या विविध संकटांच्या वेळी भाजप-शिवसेना सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचाही यावेळी आढावा घेण्यात येणार आहे.

मोहन भागवत यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d8d5d657-cdd9-11e8-9665-c71a7d30630c’]

राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही तातडीने दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसून येते, असे काँग्रेस पक्षाचे मत आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार दिरंगाई करीत असल्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी दौरा करण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा केली जाईल. औरंगाबादच्या गारखेडा परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी १० वाजता ही बैठक होणार आहे.