‘संवेदनशील मुद्याचं घाणेरडं राजकारण करतंय काँग्रेस’ !

भोपाळः पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस नेहमीच संवेदनशील मुद्यावर घाणेरड राजकारण करत आहे. येथे सभेसाठी मी येण्यापूर्वीच शेतक-याचा मृत्यू झाला होता. भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदेच्या दरम्यान एका 80 वर्षाच्या शेतक-याचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत स्पष्टीकरण दिल आहे. मध्यप्रदेश काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. आता शिंदे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले आहे. या घटनेवरून राजकारण तापल्याच दिसून येत आहे.

मध्य प्रदेशातील 28 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. त्या पार्श्वमूमीवर नेत्यांच्या प्रचार सभांना गर्दी होत आहे. नेत्यांच्या सभांमधील आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी ऐकण्यासाठी मतदारही एकत्र येत आहेत. यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चांगलेच घमाशान दिसून येत आहे.

खांडवा जिल्ह्याीतल मंधाता विधानसभा मतदारसंघात शिंदे यांची सभा होणार होती. तत्पूर्वी या सभेला हजेरी लावलेल्या एका शेतक-याचा मृत्यू झाला होता. स्टार प्रचार शिंदे यांच्या सभेपूर्वी तेथील स्थानिक नेत्यांची भाषणे सुरु होती. या दरम्यान एका 80 वर्षीय शेतक-याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वृध्द आजोबा शेजारील खुर्चा रिकाम्या झाल्या. लोक तेथून निघून गेली. मात्र तरीही नेतेमंडळीची भाषण सुरुच होत, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

कायर्कर्त्यांनी तातडीने या शेतक-याला रुग्णालयात दाखल केले होते. मी या सभेच्या ठिकाणी पोहचल्यानंतर मला या घटनेची माहिती मिळाली. त्यावेळी मी त्या शेतक-यास श्रध्दांजली वाहत मौन धारण केले. माझ्यासाठी राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे. त्यासाठी मला काँग्रेसकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही, अशा शब्दात शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.