पक्षांतरासाठी ‘मातोश्री’वरुन तब्बल २५ तर ‘वर्षा’हून २ वेळा आला फोन, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस चे अनेक मोठे नेते भारतीय जनता पक्षात आणि शिवसेनेत प्रवेश असलेल्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून दाव्या-प्रतिदाव्यांना प्रचंड ऊत आला आहे. यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एक वक्तव्य मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवरुन तब्बल २५ वेळा फोन आला असून शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी सातत्याने विचारणा होत असल्याचे सांगितले.

चंद्रपूर येथील एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार बोलत होते. त्यांनी दावा करताना सांगितले की, ‘विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेले असून आता शिवसेनेला दुसरा विरोधी पक्षनेता त्यांच्या पक्षात न्यायचा आहे. यासाठी मला मातोश्रीवरून वारंवार फोन येत असून मी तो उचलला नाही. यासाठी मातोश्रीवरुन तब्बल २५ तर ‘वर्षा’वरुन देखील २ वेळा फोन आल्याचे सांगितल्याने खळबळ माजली.’

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरुन आलेला फोन उचलून ‘जिथे आहे तिथे खूप खुश आहे’ असे प्रत्युत्तर दिल्याचे स्पष्ट केले. मोठ्या नेत्यांच्या पक्षातून गच्छंतीमुळे शरद पवारांसह विरोधी पक्षांतील सर्व मोठे नेते हतबल झाल्याचे दिसत आहे. यावर उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तरुणांना संधी देणार असल्याचे संकेत दिसत आहेत. या राजकीय भूकंपानंतर विधानसभेमध्ये राज्यात नेमके कसे चित्र असेल याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागून राहिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –