‘राम मंदिर आयोध्येत व्हावं असं काँग्रेसला देखील वाटतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारला 100 महिने झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता राम मंदिर अयोध्येत व्हावं असं काँग्रेसलाही वाटत असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्यांने सांगितले.

काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की अयोध्येत राम मंदिर व्हावं अशी काँग्रेसची देखील इच्छा आहे. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधींनी 1989 सालीच काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. आता तर यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याने हा प्रश्न निकाली लागला आहे. सर्वांच्या मनात सदभावना निर्माण व्हावी यासाठी काँग्रेसचे अनेक मंत्री, नेते राम मंदिरासाठी अयोध्येत जातील.

आज राम मंदिरासाठी महाविकासआघाडीच्या सर्व नेत्यांनी अयोध्येत यावं असे निमंत्रण शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना दिले.

2 दिवसांपूर्वी संजय राऊतांनी ट्विट करत दावा केला होती की सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील. संजय राऊतांच्या या ट्विटनंतर हे स्पष्ट झाले की उद्धव ठाकरे येत्या मार्च महिन्यात अयोध्येचा दौरा करतील. न्यायालयात अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर ते पहिल्यांदाच मार्च महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जातील.

फेसबुक पेज लाईक करा –