आता काँग्रेस देणार भाजपला 70 वर्षांच्या कार्यकालावरील प्रश्नांची उत्तरे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या ७० वर्षात देशाचा कोणताही विकास झालेला नाही आणि याला काँग्रेस जबाबदार आहे असे म्हणत भाजप नेते सातत्याने काँग्रेसवर आरोप करत आहेत. काँग्रेसमुळे देशात भ्रष्टाचार वाढला आहे, देश मागासलेला आहे, केवळ कुटुंबवादाला चालना मिळाली आहे असे अनेक आरोप भाजपच्या वतीने केलेले आहेत. पण आता काँग्रेस ‘७० वर्ष’ वर उद्भवणार्‍या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. प्रश्नावर प्रतिप्रश्न हा उत्तर देण्याचा मार्ग असेल. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस ही सुरुवात करणार आहे.

भाजपच्या प्रश्नांची अशा प्रकारे देणार उत्तरे
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस ‘मी तरुण आहे आणि माझंही एक स्वप्न आहे’ या नावाने एक स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचे जिल्हा प्रभारी व AICC सदस्य अमित सिंह म्हणाले की, ‘२५ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा आयोजित केली जाणार असून त्याची सुरुवात यूपीपासून होईल.’

एक तासाच्या स्पर्धेत भाग घेणार्‍या मुलांना ६० प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न काँग्रेसने गेल्या ७० वर्षात केलेल्या कामांवर आधारित असतील. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतची मुले सहभागी होतील. स्पर्धेतील टॉपर्सना लॅपटॉप व टॅबलेट देण्यात येणार आहेत. ‘भाजपने उपस्थित केलेले प्रश्न खोटे असून देश आज या टप्प्यावर काँग्रेसने केलेल्या कामांमुळे पोहोचला आहे हे तरुणांना सांगणे’ असे यामागील काँग्रेसचे उद्दिष्ट आहे.

स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील
सूत्रांच्या विश्वास असेल तर, २ ऑगस्ट रोजी यूपीच्या सर्व लोकसभा मतदार संघात होणाऱ्या या स्पर्धेत मुलांना जे प्रश्न विचारले जातील, ते असे असतील

१. देशात हरित क्रांती कधी आली आणि ती कोणी आणली?
२. त्याचप्रमाणे बँकांचे राष्ट्रीयकरण कधी व कुणी केले?
३. देशाच्या संरक्षणाशी संबंधित अशाच एका प्रकरणात देशातील पहिली अणुचाचणी कधी आणि कुणी केली ?

अशा प्रकारच्या प्रश्नांमुळे सध्याच्या तरुणाईला काँग्रेसच्या काळात झालेल्या कामांची माहिती होईल आणि भाजपचा दावा खोटा आहे हे पटवून देता येईल असा काँग्रेसचा विश्वास आहे.