काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यालयातच ‘धिंगाणा’

पटणा : वृत्‍तसंस्था – काँग्रेस पक्षाने खासदार निखील कुमार यांचे लोकसभेचे तिकीट कापल्याने खा. कुमार यांच्या समर्थकांनी पटणा येथील काँग्रेसच्या कार्याल्यातच प्रचंड धिंगाणा केला. पोलिसांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून शेवटी वाद मिटवला खरा पण खा. कुमार यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींवर गंभीर आरोप केले.

बिहारमध्ये महाआघाडी झालेली आहे. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातुन महाआघाडीतील हिंदुस्थानी अवाम पार्टीचे उप्रेंद्र प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबाद येथुन खा. निखील कुमार यांचा पत्‍ता कट झाल्याने खा. कुमार यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. आज खा. कुमार यांच्या समर्थकांनी पटणा येथील काँग्रेसच्या कार्यालयात प्रचंड धिंगाणा घातला. पक्षाने लोकसभेचा पत्‍ता कट केल्यामुळे खा. कुमार हे देखील नाराज असल्याचे सांगण्यात आले आहे. दररम्यान, खा. कुमार यांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयातच प्रचंड गदारोळ केल्याने महाआघाडीतील वातावरण काहीसे बिघडले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

You might also like