काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक आज, अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मिळू शकते मंजूरी, ‘या’ मुद्द्यांवर सुद्धा होईल चर्चा

नवी दिल्ली : काँग्रेस अंतर्गत निवडणुकीची मागणी होत असतानाच आज म्हणजे शुक्रवारी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होत आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कार्यक्रमाची घोषणा केली जाऊ शकते. यासोबतच सीडब्लूसीच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणि संसदेच्या बजेट सत्रावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्ष दुसर्‍या विरोधी पक्षांसोबत मिळून सरकारला घेरू शकतो.

पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुक कार्यक्रमाला सीडब्लूसीची मंजूरी मिळाल्यानंतर तारखेची घोषणा केली जाईल. राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष बनू शकतात का, असा प्रश्न विचारला असता या नेत्याने म्हटले, आम्ही सर्वजण हीच आशा करत आहोत. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी ज्याप्रकारे सक्रिय झाले आहेत, यावरून त्यांच्या परतीच्या शक्यतेला बळ मिळत आहे. मात्र, अनेक नेते या शक्यतेला नकार देत नाहीत की, सोनिया गांधी सध्या पदावर कायम राहतील.

काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत संसदेच्या बजेट सत्राबाबत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. पार्टीने अगोदरच म्हटले आहे की, संसदेत सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच विरोधी पक्षांसोबत बैठक घेतील. यूपीए अध्यक्षपदाबाबत सुद्धा प्रश्न उपस्थिती होत आहेत. शिवसेनेने अनेकवेळा एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांना अध्यक्ष बनवण्याची वकिली केली आहे. अशावेळी काँग्रेसवर दुसर्‍या पक्षांचा दबाव सुद्धा आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसह सीडब्लूसीमध्ये शेतकरी आंदोलनाबाबत सुद्धा चर्चा होण्याची अपेक्षा आहे. पक्षाच्या एका नेत्याने म्हटले की, सरकारच्या दिड वर्षापर्यंत तीनही कायदे टाळण्याच्या निर्णयावर शेतकरी संघटना निर्णय घेतील, परंतु पक्ष मानतो की, कायद्याच्या स्थगितीशिवाय समस्या सुटणार नाही. सरकार कधीही आपला निर्णय बदलू शकते. अशावेळी तीन कायदे रद्द करणे हाच मार्ग आहे.