अनेकजणांना रात्री झोपेत पडतात ‘या’ 7 प्रकारची ‘स्वप्ने’, जाणून घ्या कोणत्या स्वप्नाचा काय आहे अर्थ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : रात्री झोपेत असताना जवळपास आपणा सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारची अनेक स्वप्ने पडत असतात. आपण त्यांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करतो. मात्र स्वप्न ज्योतिषानुसार, प्रत्येक स्वप्नाचा एक विशेष अर्थ असताे. स्वप्नांचा आपल्या भविष्याशी सखोल संबंध आहे. अशी काही स्वप्ने आहेत जी बहुतेक लोक पाहतात, स्वप्न ज्योतिषानुसार त्यांचा अर्थ आम्ही याठिकाणी देत आहोत.

१) उंचावरून खाली पडण्याचे स्वप्न :
एखाद्या उच्च स्थानावरून खाली पडण्याचे स्वप्न आपणास पडले तर ते हे दर्शविते की आपल्या मनात काहीतरी चुकीचे करण्याचा हेतू आहे किंवा तुमच्या मनात कशाबद्दल तरी भीती असते.

२) कोणीतरी पाठलाग करत असल्याचे स्वप्न पाहणे :
हे स्वप्न सूचित करते की तुम्हाला एखाद्या कामापासून सुटका मिळवायची आहे किंवा आपण अशा कामाकडे दुर्लक्ष करीत आहात.

३) दात तुटल्याचे स्वप्न :
स्वप्नात दात पडलेला दिसणे अशुभ आहे. दात आत्मविश्वासाशी संबंधित आहेत. अशी स्वप्ने माणसाला खूप अस्वस्थ करतात.

४) मरण्याचे स्वप्न पाहणे
बर्‍याच वेळा आपला स्वतःचा मृत्यू स्वप्नात दिसतो. परंतु हे स्वप्न शुभ असून असे सूचित करते की आपण आपल्यातील कोणती तरी वाईट गोष्ट सोडून आपण पुढे जाणार आहेत. स्वप्नात दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मरण येताना पाहणे देखील शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडणार आहे.

५) पुन्हा पुन्हा पडण्याचे स्वप्न :
जर आपण स्वप्नात वारंवार अडखळून पडत असाल आणि तर मग समजून घ्या की आपली एखादी मोठी समस्या लवकरच संपणार आहे.

६) एखाद्या ठिकाणी उशिरा पोहचणे किंवा ट्रेन सुटणे :
उशिरा कुठेतरी पोहोचण्याचे स्वप्न दर्शविते की आपण विशिष्ट कार्याबद्दल खूपच गंभीर आणि उत्साही आहात.

७) पाण्याचे स्वप्न पाहणे :
आपल्या स्वप्नात पाणी पाहिल्यास सूचित करतो की आपल्या कोणत्या तरी समस्या लवकरच समाप्त होणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like