चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांना आवश्यक ती सर्व सामग्री पुरवण्याचं काम करत आहे. परंतु, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप उस्मानाबादचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांनी केला आहे.

जिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगरपालिकेवर आहे. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह नेण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी येतात. त्यांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षित असे पीपीई किट दिले जात नाहीत. शिवाय वारंवार कर्मचाऱ्यांनी मागणी करुनही त्यांना हँडग्लोव्हजही दिले जात नाहीत, अशी तक्रार या कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावरुन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत खोचरे यांनी त्यांची कानउघाडणी केली. यावर आता आरोग्यमंत्री आणि राज्य सरकार काय कारवाई करणार हे महत्वाचे आहे