‘म्युचुअल अंडरस्टॅन्डींग’ने केलेलं ‘सेक्स’ लग्‍नाला नकार दिल्याने बलात्कार होत नाही : हायकोर्ट

भोपाळ : वृत्तसंस्था – सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसंच त्यामुळे येणाऱ्या समस्याही समोर येत आहेत. भोपाळमधील एका प्रकराणावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लग्न होणार नसल्याचं माहित असूनही तरुणीने शारीरिक संबंध ठेवल्यास तो बलात्काराचा गुन्हा होत नाही, असं मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. एका तरूणीने लिव्ह इनमध्ये असलेल्या तरूणावर बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर न्यायालयाने सर्व चौकशी करून हा निर्णय घेतला आहे.

तक्रारदार तरूणी आरोपीच्या प्रेमात होती आणि तिला सोबत राहण्याची इच्छा होती. एकत्र राहण्याची सहमती काही तथ्यांच्या आधारावर होते. त्यामुळे तरूणी त्या वक्तव्यांवरून माघार घेऊ शकत नाही, असं न्यायालयाने सांगितलं आहे. ‘लाईव्ह लॉ’ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने लग्नाला नकार दिल्यानंतरही शारीरिक संबंध ठेवले का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसंच लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचं हे प्रकरण नाही. त्यामुळे तक्रारदार आरोपीच्या प्रेमात होती, ज्यामुळे संबंध ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण बलात्काराचे नाही होऊ शकत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सध्या अशा प्रकरणांमध्ये तरुण खरंच पीडितेसोबत लग्न करणार होता का? किंवा त्याने कोणत्या चुकीच्या हेतूने लग्नाचं आमिष दिले, हे तपासणे आवश्यक आहे. तसंच संबंधित पुरुषाने महिलेला आकर्षित करण्यासाठी एक ठराविक वचन दिलेलं नसेल, तर तो गुन्हा बलात्काराच्या समान नसेल. आरोपी पुरुषाने दिलेल्या खोट्या आश्वासनामुळेच नव्हे, तर फिर्यादी महिला तिच्या प्रेमापोटीही शारीरिक संबंध ठेवू शकते, किंवा लग्न करण्याची इच्छा असताना वचन दिल्यानंतरही काही परिस्थितींमध्ये ते वचन पूर्ण केलं गेलं नसेल, असाही प्रसंग येऊ शकतो. अशा प्रकरणांना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळायला हवं, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

तसचं पुरुषाने शारीरिक संबंध ठेवण्याच्या हेतूनेच खोटी आश्वासने दिले असेल तर हे बलात्काराचं प्रकरण होईल. परंतू महिला आणि पुरुष यांच्यातील सहमतीने झालेले शारीरिक संबंध कलम ३७६ अंतर्गत बलात्कार असू शकत नाहीत, असंही न्यायालयाने यावेळी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –