सर्वत्र कोरोनाचा हाहाकार चालू असताना शरद पवारांनी कार्यकर्त्याला श्रध्दांजली देण्यासाठी गाठलं त्याचं घर

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. दत्ता साने यांना काय त्रास होता, प्रकृती कशी होती, अशी माहिती शरद पवार यांनी घेतली. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी व चिखली ग्रामस्थांनी थेरगावच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या चौकशीची मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. दत्ता साने यांना 25 जून रोजी कोरोनाची बाध झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नते खसदार शरद पवार यांनी साने कुटुंबियांचे सात्वन केले. यावळी साने कुटुंबातील सदस्य, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल उपस्थित होते.

कोरोना विषाणूमुळे नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै रोजी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. शरद पवार आज साने यांच्या चिखलीतील निवस्थानी दाखल झाले. साने कुटुंबियांची चौकशी केली. यावेळी ग्रामस्थांनी रुग्णालयाची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली.

वायसीएमसह महापालिकेचे सर्व व खासगी रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण आहेत. वायसीएमला सुविधा पुरवण्यास मर्यादा आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये एखादे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, यासाठी तुम्ही लक्ष घालावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.