सरन्यायाधीश रंजन गोगोई प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला. त्यानंतर हा आरोप म्हणजे त्यांना फसवण्यासाठीचा कट आहे असा आरोप करण्यात आला. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्ली येथील वकील उत्सव बेन्स यांनी याबाबत गंभीर खुलासा केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी एक समिती देखील स्थापना करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. पटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती या प्रकरणाबाबत चौकशीसाठी स्थापन करण्यात आली आहे. पटनाईक यांना बंद लिफफ्यात अहवाल देण्यास सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी होत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय विशेष खंडपीठाने सीबीआय संचालक, दिल्ली पोलिस आयुक्त आणि आयबी प्रमुखांना पटनाईक यांना सहकार्य करण्यास सांगितले आहे.

खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन आणि दीपक गुप्ता यांनी वरील आदेश दिले. दरम्यान, न्यायालयाने ए. के. पटनाईक सरन्यायाधीशांविरोधात झालेल्या लैंगिक छळाचा आरोपांची चौकशी करणार नसल्याचे सांगितले. या प्रकरणी अंतर्गत चौकशी करण्यासाठी तीन न्यायमूर्तींची समिती गठीत करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयची माजी कर्मचारी असलेल्या महिलेने तिची बाजू मांडण्यासाठी आपल्याला मोठ्या रकमेचे आमिष दाखवले होते. सरन्यायाधीशांविरोधात प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी आपल्याला १.५ कोटी रुपये देऊ केले होते, असा दावा या बेन्स यांनी केला होता.

Article_footer_1
Loading...
You might also like