नगरसेवक अविनाश बागवे यांच्या अटकेमागे भाजपचे षडयंत्र

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक करण्यामागे भाजपच्या नेत्यांचा हात आहे, याच नेत्यांनी पोलिसांवरही दबाव आणला, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6307195b-c0c5-11e8-9485-b36cba16c261′]
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, कमलताई व्यवहारे, नगरसेवक अरविंद शिंदे, अजित दरेकर, लता राजगुरू, रवि धंगेकर आदी उपस्थित होते.

भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार पाटील यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी कासेवाडीत विसर्जन मिरवणुकी अगोदरच वातावरण बिघडविले होते. चिथावणी देणारे व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकाराची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली होती. तरीही पोलीस बंदोबस्त वाढविला नाही, असा आरोप बागवे यांनी केला. यावेळी बोलताना काँग्रेसचे पालिका गटनेते अरविंद शिंदे यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे नांव पोलिसांवरील दबावासंदर्भात घेतले.

‘सिंघम’च्या बायकोची ‘सटकली’, काजोलची अजय देवगणला ‘धमकी’

अविनाश बागवे यांच्यावर वेगवेगळी कलमे लावून खोटे गुन्हे लावले असून सत्य बाहेर आले पाहिजे, अशी मागणी रणपिसे यांनी केली . संपूर्ण प्रकरणात चिथावणी देणाऱ्या तुषार पाटील यांच्यावर डॉल्बी वाजविल्याचा गुन्हा दाखल केला. हा पक्षपात आहे, असे रणपिसे म्हणाले. काल सोमवारी कासेवाडी हद्दीतील पोलिस अधिकाऱ्यांनी मोबाईल फोन बंद का ठेवले ? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता ? अशी विचारणा रणपिसे यांनी केली.

[amazon_link asins=’B00V0II33M,B0786N5FGT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f80334b9-c0c5-11e8-ae6e-2f4fb0011a6f’]