शरद पवारांच्या हत्येचा ‘कट’, पुण्यात ‘तक्रार’ दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रकार भाऊ तोरसेकर आणि पोस्टमन या पोर्टलवर कमेंट करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसात तक्रार केली आहे.

letter
गेले अनेक महिने समाज माध्यमांवर टोकाच्या विद्वेषाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करुन महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय ऐक्याला तडा जाईल अशी अनेक पोस्टर सोशल मीडियावर पाहत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल असे वाटत होतं. याकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले गेले नाही.
letter
मात्र महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पत्रकार भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर लोकांकडून सातत्याने यू ट्यूबवर (पोस्टमन पोर्टल, थिंक बँक) वर अपलोड केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब आणि गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे निदर्शनास आल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.