महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या प्रेमात पडलेल्या कॉन्स्टेबलची आत्महत्या

सिकर (राजस्थान) : वृत्तसंस्था – महिला पोलीस उपनिरीक्षकावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या पोलीस कॉस्टेबलचा प्रेमभंग झाल्याने त्याने स्वत:ला पेटवून घेतले. त्याच्यावर जयपूरमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दौलत सिंह असे या मृत कॉन्स्टेबलचे नाव आहे. दौलत सिंह हा सिकर शहरातील पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पोलीस त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधत आहेत. मात्र, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या प्रेमात पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

बुधवारी दौलत सिंहने त्याच्या बाईकमधून पेट्रोल काढून स्वत:वर शिंपडले. त्यानंतर तो महिला पोलीस उपनिरीक्षक तैनात असलेल्या पोलीस ठाण्यात गेला. तेव्हा संबंधित महिलेने त्याच्याबरोबर बोलायला नकार दिला. तेव्हा त्याने पेटवून घेतले. मृत दौलत सिंह मागील अनेक दिवसांपासून तिच्या प्रेमात पडला होता. तो तिचा पाठलाग करत होता अशी माहिती सिकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक बलराम मीन यांनी दिली.

घटनेच्या दिवशी त्याने महिला पोलिसाच्या फोनवर १६ फोन केले. दौलत सिंह याचे लग्न झाले आहे. काही महिन्यांपूर्वी तो आणि महिला पोलीस उपनिरीक्षक एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी दौलत सिंह बद्दल वरिष्ठांना समजले. त्यांनी दोघांची दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदली केली. दौलत सिंह याच्या पत्नीने ही कौटुंबीक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. या घटनेत तो ६० टक्के भाजल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा रविवारी मृत्यू झाला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like