Video : युवकाला बेशुध्द होई पर्यंत बेदम मारहाण करणारा पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत, व्हिडीओ पाहून अंगावर येतील काटे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना संकटात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. याच दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारांनी दारू विक्रीस परवानगी दिली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यामध्ये पोलिसांनी दारुच्या आहारी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हयरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकजण पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत होते. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशात पोलिसांच्या क्रौर्याचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, शनिवार पासून मध्यप्रदेशातील पोलिसांच्या क्रौर्याच एक व्हिडिओ फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत दोन पोलीस पिपला भागात राहणाऱ्या नानू (वय-25) याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. एक पोलीस त्याला काठीने मारहाण करत आहे. तर दुसरा पोलीस त्याला प्रोत्साहन देत आहे. कॉन्स्टेबल नानूला एकामागून एक काठीचे फटके मारत आहे. पोलिसांच्या मारहाणी हा तरूण बेशुद्ध पडल्याचे दिसत आहे.

प्रशांत भूषण यांनी शेअर केला व्हिडिओ

व्हिडिओ जवळ असलेल्या एका दुकानदाराने बनवला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस नेता द्विग्विजय सिंह आणि सोशल मीडियावरील लोकांनी या पोलिसांना अटक करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण यांनी देखील व्हिडिओ व्हायरल करत म्हटले आहे की, पोलीस या तरूणाला किती बेदम मारहाण करत आहेत. या पोलिसांना केवळ निलंबित केले नाही पाहिजे तर त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे.

12 -12 दिवसापूर्वीचा व्हिडिओ

पोलिसांच्या मारहाणीचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ 10-12 दिवसांपूर्वीचा आहे. छिंदवाडाचे पोलीस पोलीस अधीक्षक विवेक अग्रवाल म्हणाले की, व्हायरल व्हिडिओच्या आधारे दोन पोलीस हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. ते म्हणाले, व्हिडिओमध्ये दोघेही एका तरुणाला मारहाण करताना दिसले आहेत. आरोपींविरुद्ध विभागीय चौकशी व आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, नानूला दारूचे व्यसन होते. त्याने या भागात अनेक वेळा गोंधळ घातलेला आहे.

नानू शिवीगाळ करत होता

विवेक अग्रवाल यांनी सांगितले की, नानूच्या अशा वागण्यामुळे त्याचे कुटुंबीय देखील त्रस्त होते. यापूर्वी त्याच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. घटनेच्या दिवशीही नानू मद्यधुंद अवस्थेत होता. तो बँकेबाहेर लोकांना शिवीगाळ करत होता. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी गेले. त्याने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. व्हायरल झालेला व्हिडिओ यानंतरचा आहे. पोलिसांनी नानूवर केलेली कारवाई ही योग्य नव्हती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like