Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी आहारात समाविष्ट करा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Constipation Cure Tips | लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंतच्या सर्वांना बद्धकोष्ठतेच्या (Constipation) समस्येने ग्रासून टाकले आहे. खाण्यापिण्याच्या विचित्र सवयींमुळे अशा समस्या उद्भवू लागतात. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे त्याला आराम मिळू शकतो (Constipation Cure Tips).

 

आहारात समाविष्ट कराव्या लागणार ४ गोष्टी (4 things To Include In Diet) –

बद्धकोष्ठतेवर उपाय (Remedy For Constipation) :
आजकाल प्रत्येक तिसर्‍या व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या असते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांना आपल्या खाण्याकडे खुप लक्ष द्यावं लागतं, नाहीतर प्रत्येक दिवशी त्यांचं पोट बिघडतं. अशा परिस्थितीत कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सेवनाने तुमची बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होईल आणि तुम्हाला आराम वाटेल. हे जाणून घेऊया (Constipation Cure Tips).

 

१) पाणी (Water) :
पाणी आपल्या शरीरासाठी खुप महत्वाचे आहे. त्यामुळे दिवसातून ७-८ ग्लास पाणी प्यायला हवं. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची तक्रारही दूर होते. शरीर हायड्रेटेड (Hydrated) ठेवण्यासाठीही पाणी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं.

२) फायबरयुक्त गोष्टींचे सेवन करा (Eat Fiber Rich Foods) :
ज्या लोकांना नेहमी बद्धकोष्ठता जाणवते, त्यांना त्यांच्या आहारातही काही बदल करावे लागतील. आपण जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यात ओटमील, बार्ली, मटार, बीन्स, मसूर, लिंबू आणि सफरचंद यांचा समावेश आहे.

 

३) बदाम (Almond) :
बदाम ह असा ड्रायफ्रुट्सचा प्रकार आहे, त्याचे सेवन करून अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करता येते. खरं तर बदामात भरपूर प्रमाणात निरोगी चरबी, प्रथिने, मॅग्नेशियम आणि फायबर असतात, ज्यामुळे गॅसची समस्या देखील दूर होते.

 

४. बेरी (Berry) :
बेरीचे अवश्य सेवन केले पाहिजे, कारण त्याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Constipation Cure Tips | constipation cure tips for healthy stomach acidity gas and digestion problem stay away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

30 Plus Skin Care | वाढत्या वयातही तुम्हाला नवीन आणि सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

 

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

 

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात