मशिदीत नमाज पठणाचा निर्णय संविधान पिठाकडे नाही : सुप्रीम कोर्ट

दिल्ली: वृत्तसंस्था

मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (दि. २७) निर्णय दिला. प्रत्येक निर्णय त्या परिस्थितीरूप घेतलेला असतो असे कोर्टानं स्पष्ट केलं. मशिद हा इस्लामचा अविभाज्य घटक आहे का यावर १९९४ साली निकाल देताना फारूखी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं, मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नसल्याचे स्पष्ट केले होते आणि सरकारनं मशीद ताब्यात घेणं घटनाविरोधी नसल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचेही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a7fb2ce-c237-11e8-b46b-c533ab91f67a’]
या निकालामुळे बाबरी मशीदीप्रकरणी फारूखी प्रकरणाचा प्रभाव पडणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. बाबरी मशीदीचा निकाल जागेची मालकी कुणाकडे यावरच ठरेल असे संकेत त्यामुळे मिळाले आहेत.

१९९४ मध्ये एम. इस्माईल फारूकी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात पाच सदस्यीय पीठाने मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानुसार वादग्रस्त जमिनीचे सरकारला अधिग्रहण करता येईल, असे पाच सदस्यीय पीठाने तेव्हा स्पष्ट केले होते. त्या निकालाचा विस्तारित पीठाकडून पुनर्विचार केला जावा, अशी मागणी अयोध्या मालमत्ता वादात पुढे आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय पीठाने गुरुवारी दुपारी निर्णय दिला.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3516e502-c238-11e8-8ebe-25cddb6ae9e0′]