संविधान जाळण्याच्या प्रकाराचा काँग्रेस कडून निषेध

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

भारताचे संविधान जाळण्याच्या दिल्लीत घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d736390d-9d66-11e8-ad91-d92e536b6300′]

केंद्र आणि राज्यातील सरकारच्या आशीर्वादाने संविधान विरोधी जातीय व धर्मांध शक्तिंनी देशात धुडगूस सुरू केला असून आता संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. संविधानाच्या रक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन मनुवादी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष लढा देईल. केंद्रातील भाजप सरकारने राज्यघटना जाळण्याचे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी बागवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. काही विकृत मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी आरक्षणाला विरोध करत राज्यघटनेला जाळण्याचे दुष्कृत्य केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.