Constitution Day | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ ऐतिहासिक वारसा मुरबाड भूमीत भारतीय संविधानाचा 72 वा वर्धापन दिन साजरा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन  Constitution Day | भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेला मुरबाड तालुक्यात भारतीय संविधानाचा (Constitution Day) 72 वा वर्धापन दिनाचा सन्मान सोहळा, मुरबाड शहरासह खेडले,नारीवली तसेच सर्व तालुक्यात व जगभरात साजरा होत असताना.ओबीसी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद मडके, भालचंद्र गोडांबे, एकनाथ देसले, लक्ष्मण घागस,अरुण ठाकरे व भारतीय बौध्द महासभेच्या वतीने मुरबाड शहरात भारतीय संविधानाची जनजागृती करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली होती.

 

मुरबाड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संविधान (Constitution Day) सन्मान सोहळा आयोजित केला असता. पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून 2 वर्षे 11 महिने व 17दिवसात राज्य घटना तयार केली.

त्यामुळे खरे बाबासाहेबांचे आयुष्य घटले .त्यांचे या योगदानामुळे पृथ्वी तलावरील मानव जातीला खरे मुलभूत अधिकार आणि हक्क मिळाले आहेत.
आज भारत देशाचे सर्व कारभार हे भारतीय संविधानाचे माध्यमातून चालत आहेत. असे उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या प्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार.सभापती. दिपक पवार,
मुकेश शिंदे. व दादासाहेब शिंदे यांचे वतीने, दिपक पवार, उपसभापती स्नेहा धनगर, श्रीकांत धुमाळ यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संविधान दिना निमित्ताने नारीवली ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा करण्याचा मान पोलीस नामा ऑनलाईन मुरबाड रिपोर्टर अरुण ठाकरे यांना मिळाला यावेळी उपस्थित ग्रामसेवक गोरले,
सरपंच देवयानी भोईर, उपसरपंच क्लपेश सोलसे, पत्रकार श्याम राऊत, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थान च्या उपस्थित संविधानाचे वाचन ग्रामपंचायत सदस्य दयानंद भोईर यांनी करून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

 

Web Title : Constitution Day | Dr. Babasaheb Ambedkar’s Unparalleled Historical Heritage Celebrates 72nd Anniversary of Indian Constitution in Murbad Land

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Balika Vadhu-2 | नऊ वर्षांनी पुढे गेली बालिका वधूची कहाणी; शिवांगी जोशी, समृद्ध आणि रणदीपची धमाकेदार एन्ट्री

Earwax Cleaning Tricks | कानातील मळ काढण्याची ‘ही’ पद्धत अतिशय धोकादायक, सावध व्हा ! अन्यथा फाटू शकतो कानाचा पडदा

Kareena Kapoor | शेअर केलेल्या 108 सूर्यनमस्कारांच्या व्हिडीओमुळे करिना कपूर झाली ट्रोल