ग्राहक आयोगाचा Insurance कंपनीला दणका ! तक्रारदाराला 8 लाख 69 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कारची विमा रक्कम न देणाऱ्या इ्न्शुरंस कंपनीला जिल्हा ग्राहक आयोगा (Consumer Commission) नं दणका दिला आहे. तक्रारदाराला 8 लाख 69 हजार रुपये 9 टक्के व्याज दरानं द्यावेत. तसेच आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास, तक्रारीचा खर्च असं सर्व मिळून 50 हजार रुपये देण्याचा निकाल जिल्हा ग्राहक आयोगा(Consumer Commission) चे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितिजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी दिला आहे.

या प्रकरणी राजेश श्रीराम चौबे (रा बाणेर) यांनी गो डिजिट जनरल इन्शुरंस या कंपनीविरुद्ध तक्रार केली होती. चौबे यांनी वाकड येथील गारवेल मोटर्समधून 12 लाख 72 हजार रुपयांना कार घेतली. यासाठी त्यांनी बँकेकडून 9 लाख 80 हजार रुपयांचं लोन घेतलं. कारसाठी त्यांनी 2019 पर्यंतचा विमा घेतला होता. तो 8 लाख 71 हजारांचा विमा करार निश्चित करण्यात आला होता. विमा आकारणीच्या रकमेत विनादावा सटू देण्यात आली. मात्र ही सूट अनावधानानं देण्यात आल्याचं लक्षात आल्यावर विमा कंपनीनं त्यांना तसं कळवलं. त्यानुसार चौबे यांनी सूट दिलेली रक्कम परत जमा केली.

मे 2019 मध्यै चौबे यांच्या कारला पुणे-बारामती रोडवर अपघात झाला. कार दुरुस्तीच्या वेळी कंपनीकडून विनादावा सूट रक्कम मिळाली नसल्याचं सांगण्यात आलं. तक्रारदारानं पाठपुरावा केल्यानंतर केवळ इतर भागांचा विमा मंजूर होईल, इंजिनची नुकसान भरपाई मिळणार असं सांगण्यात आलं. तक्रारदारकडून कागदपत्रे घेऊन वाहनाचे विक्री मूल्य 3 लाख 75 हजार रुपये निश्चित करण्यात आले. तसेच 45 दिवस कार सांभाळल्याचे तक्रारदाराकडून 13 हजार रुपये घेण्यात आले. विमा रक्कमही तक्रादाराला देण्यात आली नाही. त्यामुळं तक्रारदाराला कर्जापोटी 15 हजार 967 रुपये द्यावे लागत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं.

ग्राहक आयोगानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तक्रारदाराची तक्रार ग्राह्य धरून विमा रक्कम व्याजासह परत द्यावी. वाहन सांभाळण्याचे 13 हजार रुपये शुल्क, वाहन दुरुस्तीला नेण्याचे 2900, 3 महिने कर्ज परतावा रक्कम 47,901 रुपये तसेच पुढील कर्ज परतावा रक्कम, नुकसान भरपाई 1लाख 25 हजार आणि तक्रारीचा खर्च 50 हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.