मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचं ‘हे’ मोठे कारण, RBI नं ‘या’ अहवालात दिली माहिती, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्थव्यवस्थेतील आर्थिक मंदीचे सर्वात मोठे कारण म्हणजे मागणी आणि खप(उपभोग) कमी होणे असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय रिझर्व बँकेने शुक्रवारी द्वि-मासिक चलनविषयक धोरणानंतर (RBI MPC) म्हटले आहे की ग्राहकांकडून वस्तू आणि सेवेच्या मागणीचे प्रमाण गेल्या ६ वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले आहे. आरबीआयने म्हटले आहे की ग्राहकांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होण्याची प्रमुख कारणे बेरोजगारीसह उत्पन्नातील घट हे आहेत. यावेळी प्रकाशित झालेल्या ‘कंज्यूमर सेंटीमेंट सर्वे रिपोर्ट’ मधून अनेक तथ्यात्मक बाबी समोर आल्या आहेत.

काय आहे उपभोगविषयक निर्देशांकांची स्थिती :
सप्टेंबरमध्ये ग्राहकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास कमकुवत होता. सध्याचा सिच्युएशन इंडेक्स (Current Situation Index) आणि फ्यूचर एक्स्पेक्टेशन इंडेक्स (Future Expectation Index) सप्टेंबरमध्ये अजून घसरला. ग्राहक सेवा सर्वेक्षण अहवालात आरबीआयने ही माहिती सांगितली आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणारा करंट सिचुएशन इंडेक्स सप्टेंबरमध्ये ८४ वर घसरला असून जुलैमध्ये ९५.७ इतका होता. यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये हा निर्देशांक ८८ च्या पातळीवर होती.

रोजगाराच्या आघाडीवर लोकांच्या अपेक्षा घटल्या :
आरबीआयच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की अर्थव्यवस्था आणि रोजगाराबाबतच्या लोकांच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत. येत्या काही वर्षांत आपल्या उत्पन्नाबद्दल फारच कमी लोक आशावादीपने पाहतात. लोकांची विचारसरणी आणि रोजगाराची आशा सप्टेंबरमध्ये पर्यंत कमी झाली आहे, जी जुलै महिन्यात अधिक होती. हे देखील धक्कादायक आहे की मार्च २०१८ नंतर प्रथमच असे घडले आहे की उत्पन्नाबाबत लोकांमध्ये नकारात्मकता निर्माण झाली आहे.

१३ शहरांमध्ये झाले सर्वेक्षण :
तथापि, आरबीआयने असेही म्हटले आहे की जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीबाबत लोकांच्या भावना आणि निर्णय ठाम आहेत. मध्यवर्ती बँकेने हे सर्वेक्षण १३ शहरांमधील ५,१९२ घरांत केले आहे. यात अहमदाबाद, बेंगलुरू, भोपाळ, दिल्ली, मुंबई यासारख्या शहरांचा समावेश आहे. या घरांमध्ये, आरबीआयने सर्वेक्षणात लोकांना सध्याच्या काळातल्या अर्थव्यवस्था, रोजगार, महागाई आणि वैयक्तिक उत्पन्न आणि खर्चावर त्यांचा काय विश्वास आणि मत आहे याबाबत प्रश्न विचारले.

पॉलिसी व्याजदरात सलग पाचव्या वेळी कपात :
हे लक्षात घेण्यासारखे आहे की एप्रिल ते जून दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर ५ टक्के होता, जो गेल्या ६ वर्षातील सर्वात नीचांकी पातळी आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे वापर आणि मागणी कमी होणे. शुक्रवारी आरबीआयने यंदा सलग पाचव्या वर्षी पॉलिसी दरात कपात केली आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ एवढी घट केली आहे.

visit : Policenama.com