केस उगवले नाही म्हणून ग्राहकाची अभिनेत्याविरोधात FIR, मागितली ‘एवढी’ भरपाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीव्ही, वर्तमानपत्रांमध्ये विविध वस्तूंच्या जाहिराती दाखवल्या जातात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या अनेक युक्त्या वापरत असतात. आकर्षक जाहिराती पाहून अनेक लोक त्या वस्तू खरेदी करतात. मात्र, जाहिरातीत सांगितल्या प्रमाणे या वस्तूचा परिणाम होत नाही पण त्यामुळे मोठे नुकसान मात्र नक्की होते. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. एका ग्राहकाने जाहिरात पाहून हेअर क्रीम प्रोडक्टची (Hair Cream Product) खरेदी केली. मात्र, या क्रीमचा त्याला काहीच फायदा झाला नाही. केस न उगवल्याने चिडलेल्या या ग्राहकाने थेट या प्रोडक्टची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्याविरोधाच तक्रार केली आहे.

जाहिरातीमध्ये दाखवल्या प्रमाणे झाले नसल्याने जाहिरातूमधून चुकीचा दावा केला असल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. त्यामुळे या ग्राहकाने थेट अभिनेत्यालाच जबाबदार धरलं असून त्याच्याकडे नुकसान भरपाई मागितली आहे. विशेष म्हणजे केरळच्या कंन्झ्युमर कोर्टानं हेअर क्रीम प्रोडक्टची जाहिरात चुकीचा असल्याचा दावा करणाऱ्या चित्रपट अभिनेत्याला जबाबदार ठरवलं आहे. अभिनेत्याने जाहिरात करताना प्रोडक्टची माहिती करून न घेता जाहिरात केली. थ्रिसूरच्या जिल्हा ग्राहक फोरमनं धात्री हेअर क्रीम (Dhathri hair cream) तयार करणाऱ्या कंपनीला आणि या कंपनीची जाहिरात करणारा अभिनेता अनुपला दंड ठोठावला आहे.

क्रीमचा काहीच फायदा झाला नाही
फ्रान्सिस वडक्कन नावाच्या व्यक्तीने ए-वन मेडिकल्स, धात्री आयुर्वेद प्राइव्हेट लिमिटेड आणि अनुप मेनन यांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, फ्रान्सिस यांनी 2012 मध्ये 376 रुपयांना ही हेअर क्रीम खरेदी केली होती. क्रीममुळे केस उगवतात अशी जाहिरात कंपनीने केली होती. ही जाहिरात पाहिल्यानंतर क्रीम खरेदी केली. हे प्रोडक्ट सहा आठवडे वापरल्यानंतर हेअर ग्रोथ होईल असा दावा या जाहिरातीत काम करणाऱ्या अनुप मेनन याने केला. मात्र, क्रीमचा वापर केल्यानंतर काहीच फायदा झाली नाही. त्यामुळे फ्रान्सिस यांनी फोरमकडे दाद मागितली आणि संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. तसेच त्यांनी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे.

एका रिपोर्टनुसार, अनुप मेनन यांनी आपण या प्रोडक्टचा वापर केला नसल्याचे म्हटलं आहे. ते फक्त त्यांच्या आईने तयार केलेल्या हेअर ऑईलचा वापर करतात असे सांगितले. जाहिरातीमध्ये काय सांगितले जाते, हे आपल्याला माहिती नाही. कारण ही मॅन्युफॅक्चर स्टोरी होती. हे हेअर ग्रोथ प्रोडक्ट नाही तर हेअर केअर प्रोडक्ट असल्याच म्हटले आहे. फोरमने जाहिरातीत देण्यात आलेली आश्वासने आणि त्याच्या वापरानंतर मिळणारा रिझल्ट यामध्ये तफावत आहे. याशिवाय या प्रोडक्टमध्ये जी नोट देण्यात आली आहे. त्यामध्ये देण्यात आलेल्या सूचना देखील नीट दिसत नसल्याचे म्हटले आहे. असे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.