DSK यांना ग्राहक मंचचा दणका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठेवीदारांची कोट्यवधींची फसणूक केल्याप्रकऱणी कारागृहात असलेल्या डिएस कुलकर्णी यांना ग्राहक मंचने दणका दिला आहे. ठेवीदारांनी गुंतविलेली १८ लाख १० हजार रुपयांची रक्कम व्याजासह ४५ दिवसांत परत करावी असा आदेश ग्राहक मंचने दिला आहे.

याप्रकऱणी अतुल दत्तात्रय रालेभट, कल्पना दत्तात्रय रालेभट यांनी डिएसके यांच्या तीन कंपन्यांविरोधात तक्रार दिली होती. त्यांनी डिएस कुलकर्णी अँड ब्रदर्स, डी एस कुलकर्णी अँट असोसिएट्स, डि. एस. कुलकर्णी बिल्डर्स या कंपन्यांमध्ये १८ लाख १० हजार रुपये गुंतविले होते. त्यावर त्यांना १२ टक्क्यांनी व्याजही दिले जाणार होते. मात्र ठेवींची मुदत संपल्यानंतर त्यांना दिलेले धनादेश वटले नाहीत. तसेच याबाबत कंपन्यांकडे चौकशी केल्यावर मंदीचे कारण सांगून टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे त्यानी २०१७ मध्ये ग्राहक मंचकडे तक्रार केली होती.

मंचाचे अध्यक्ष अनिल ख़डसे, सदस्या क्षितिजा कुलकर्णी, संगिता देशमुख यांच्यासमोर याची सुनावणी झाली. डिएसके यांच्या वतीने त्यांचे वकिल मंचासमोर हजर झाले. परंतु त्यांनी लेखी म्हणणे सादर केले नाही. सेवेत दोष असल्याचा निष्कर्ष मंचाने काढला. त्यानंतर डिएसके यांनी १८ लाख १० हजार रुपये आणि १ लाख ८ हजार रुपयांच्या व्याजासह तक्रारदार यांना ४५ दिवसांच्या आत द्यावेत असा आदेशमंचाने दिला. तर त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी २५ हजार तर तक्रार अर्जाच्या खर्चासाठी ५ हजार रुपये द्यावेत असा आदेश दिला.

आरोग्य विषयक वृत्त-
केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे
सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका
चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार